इंडस्ट्री ४. ० म्हणजे नक्की काय? कृत्रिम बुद्धीमत्तेची (Artificial Intelligence ) ची जेवढी चर्चा होते तेवढे खरेच ते महत्वाचे आहे का? ए आय मुळे खरेच नोकऱ्या जाणार आहेत का? आजच्या तरुणाईला जॉब मिळवण्याला या इंडस्ट्री ४. ० चा फायदा होणार का तोटा? नोकरी मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? 5G येईल तेव्हा काय बदल घडतील? इंडस्ट्री १, २, ३ आणि ४ मधील मूळ फरक काय? येणाऱ्या काही वर्षात कोणत्या नोकऱ्या राहतील आणि कोणत्या जातील? नोकरी मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी कोणत्या १० गोष्टी करायलाच हव्यात? गाव असो वा शहर, पैसे असोत वा नसोत, सर्वाना मोफत उपलब्ध असणाऱ्या नोकरी देऊ शकतील अशा गोष्टी कोणत्या? सतत बदलणाऱ्या जगात जॉब मिळवायचा रामबाण मार्ग कोणता?