महाराष्ट्रातील स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त आनंदी आहेत.' अलीकडेच झालेल्या एका मानसशास्त्रीय संशोधनातून समोर आलेलं हे निरीक्षण. असं असलं तरी स्त्रिया खरंच आनंदी आहेत? त्यांच्या आनंदाची व्याखा काय आहे? त्यामागची कारणं काय आहेत, हे सगळं उलगडणारं बायकांच्या हॅप्पीनेसचं गणित, ऐका या पॉडकास्टमधून. 'लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स एंड पॉलिटिक्स'मधून मानसशास्त्रात उच्चशिक्षण घेणाऱ्या रिया दशरथ हिच्या संशोधनातून समोर आलेल्या स्त्रियांच्या हॅप्पीनेसबद्दलच्या इंटरेस्टिंग गोष्टी!