लॉकडाऊनच्या दरम्यान अनेकांची पावलं गावाकडे वळली, 'वर्क फ्रॉम होम' करता करता अनेकांनी आपली शेतीची आवडही जोपासली. तर काहींनी 'शेती करणं' हेच आपलं करिअर म्हणून निवडलं! खरंच मुख्य प्रवाहातून बाजूला येत वेगळी वाट चोखाळत शेती करणं शक्य आहे का, ज्यांना शेतीतील काहीच माहिती नाही असे लोक शेती करू शकतात का, कोणत्या जमिनीत कोणती पिकं लावावीत, शेतीसोबत कोणता जोडधंदा असावा? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं 'शेतकरिअर' या पॉडकास्टमध्ये वरिष्ठ कृषी पत्रकार व विश्लेषक दीपक चव्हाण यांनी दिली आहेत. ज्यांच्या मनात शेती करण्याचा विचार घोळत आहे त्यांनी लगेचच ऐकावा असा पॉडकास्ट! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans