सायबर स्पेसमध्ये आणि खऱ्या जगण्यात ही आपल्याला काही गोष्टी सोडून द्याव्या लागणार आहे. मला सागळ्यातलं सगळं माहीत आहे आणि मला सगळं हवं आहे यापलीकडे आपल्याला जावं लागेल, आपल्या मुलांना मिसिंग आऊट असण्यातली गंमत सांगावी लागेल. थोडा पॉज घेऊन स्वतःला सायबर शिस्त लावली लागेल तरच या जगातून येऊ घातलेल्या नव्या समस्यांना आपण तोंड देऊ शकू. मुलांना सायबर शिक्षित करू शकू.. जॉय ऑफ मिसिंग आऊट नक्की काय आहे याविषयी मुक्ता चैतन्य आणि मानसोपचारतज्ञ डॉ. हमीद दाभोळकर यांच्या मनमोकळ्या गप्पा!