मुलांकडे स्वतःची गॅजेट्स वयाच्या नवव्या, दहाव्या वर्षी येतात. पालक कौतुकाने त्यावर अनेक OTT चॅनल्स घालून देतात पण मुलांनी काय बघावं आणि काय नाही याबाबत मात्र पुरता गोंधळ आहे. मुलांशी OTT वरून दिसणाऱ्या बोल्ड सीन्स बद्दल चर्चा कशी करायची? मुळात मुलांना स्वतःच्या गॅजेट्समध्ये स्वतंत्र OTT ऍक्सेस देणं योग्य आहे का? पालकांबरोबर आता मुलंही बिंज वॉचिंग करायला लागली आहेत, अशात टीव्हीची जागा पालक आणि मुलांच्या आयुष्यात OTT घेऊ बघतंय का? तसं असेल तर मनोरंजनाचा एकूण पॅटर्न बदलतोय का? आणि कसा? याविषयी प्रसिद्ध समीक्षक आणि अभ्यासक गणेश मतकरी यांच्याशी मुक्ता चैतन्य यांनी साधलेला विशेष संवाद!