आजवरच्या मानवी इतिहासात नैसर्गिक स्थित्यंतरं, वातावरणीय बदल यांमुळे अनके मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एखाद्या भूभागात राहणारी माणसं ही तिथल्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात. ती संसाधनं मानवी समूहाची गरज भागवण्यास अपुरी पडू लागली की आजूबाजूच्या इतर भागातील संसाधनांवर आपला हक्क सांगू पाहतात. त्यातून संघर्ष उभे राहतात. देश आपापसात भिडतात आणि जागतिक अशांतताही निर्माण होते. १७ व्या शतकात झालेल्या अनके युध्दांमागे नैसर्गिक बदल होते असं जॉफ्री पार्कर नावाच्या एका प्रसिद्ध इतिहासकाराने म्हटलंय. याचीच प्रचिती सध्या भारताच्या ईशान्य दिशेला असलेल्या, भारताच्या सामरिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि नैसर्गिक संसाधनांनी संपन्न असलेल्या तिबेट या देशाला येत आहे. तिबेटच्या नैसर्गिक संपत्तीवर हक्क सांगू पाहणारा चिनी राक्षस आता स्वतःची तहान भागवण्यासाठी तिबेटच्या अस्तित्त्वावर घाला घालू पाहतोय. हा नवा जलसंघर्ष नक्की आहे तरी काय? ऐकुया.