गुगल आणि जिओचा नवा फोन येणार होता, तो का आला नाही? टेस्लाच्या इलेक्ट्रिक गाड्यांचं प्रॉडक्शन का थांबलंय? तुम्ही समजा घरातल्या फ्रीज किंवा वॉशिंग मशीनची ऑर्डर दिली असेल तर ती ऑर्डर सुद्धा का लेट होत आहे? या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. एक नखाएवढी चीप नसल्यामुळे! अर्थातच सेमीकंडक्टरच्या शॉर्टेजमुळे. आता नेमकं हे सेमीकंडक्टरच शॉर्टेज म्हणजे काय? हेच आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊ.