मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे यांची नावं जरी उच्चारली तरी ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. या महान साहित्यिकांचे स्मरण करतानाच उलगडत जातात विनोदी साहित्यातील एकाहून एक भन्नाट किस्से आणि आठवणी. हे सारे खरोखर आपल्याला पुलकित करणारे क्षण. प्रा. मिलिंद जोशी यांसमवेत रंगलेली ही किश्शांची, आठवणींची सुहास्य मैफल याच क्षणांना आपणापुढं नव्यानं घेऊन येते.