१९७० ते ७५ या कालखंडादरम्यान अवचटांनी 'साप्ताहिक मनोहर', 'साधना'मध्ये लिहिलेले महत्त्वपूर्ण लेख या संग्रहात एकत्रित करण्यात आले आहेत. अनिल अवचट गेली चाळीसहून अधिक वर्षं विविध सामाजिक प्रश्नांवर लिहीत आहेत. आज लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले अवचट मुळात पिंडाने पत्रकार. त्या भूमिकेतूनच ते पंतप्रधान इंदिरा गांधींपासून चळवळीतल्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांसोबत वावरले. त्यांना दिसणारं जग त्यातल्या कंगोर्यांसह लेखणीतून उतरवत राहिले. त्यांचं हे लेखन आजच्या पिढीला ज्ञात नाही. अवचटांचं हे लिखाण म्हणजे सामाजिक वास्तवाचं भान ठेवून केलेल्या राजकीय पत्रकारितेचा वस्तुपाठच. वृत्तपत्रीय रिपोर्टिंगची रूढ चौकट मोडून आपल्या चित्रमय लेखनशैलीने राजकीय-सामाजिक अंतर्प्रवाहांना आवाज देणारा हा दस्तावेज.अनिल अवचट लिखित मराठी कादंबरी "रिपोर्टींचे दिवस " ऐका - अतुल पेठे यांच्या आवाजात.