इंटरनेटची दुनिया जादुई आहे. या जगाला जशी काळी बाजू आहे तसेच या जगात वावरण्याचे अनेक फायदेही आहेत. कल्पना, इनोव्हेशन, कनेक्टिव्हिटी आणि संवाद या जमेच्या बाजू आहेत ज्यांचा सुयोग्य वापर आज गरजेचा आहे. इंटरनेट, सोशल मीडिया आणि स्मार्ट फोनला आधुनिक जगातल्या क्रांती मानलं जातं. ही माध्यमं तुम्ही आय हेतूने वापरता यावर त्याचे परिणाम काय होतील हे अवलंबून असतं. म्हणूनच व्हर्चुअल जगाच्या फायद्यांचा, सकारात्मक वापराचा विचारही आवश्यक आहे. त्याविषयीही बोललं गेलं पाहिजे. सायबर अभ्यासक उन्मेष जोशी यांच्याशी मुक्ता चैतन्य यांनी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा.